
राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांच्या कर्तुत्वाने बुलढाणा जिल्हा पुणीत झाला आहे. बाळराजे यांच्या शिक्षणाचा भार पेलून त्यांना स्वराज्य शिरोमणी बनवणाऱ्या मा जिजाऊंच्या बुलढाणा जिल्ह्यात आज शिक्षणाची अवस्था काय आहे? किती विद्यार्थी आयआयटी ला गेले?
किती विद्यार्थी एमबीबीएस ला गेले?
थोडासा मागोवा घेतला की निर्माण झालेली बिकट स्थिती लक्षात येते.
जिल्ह्याबाहेर जाऊन लाखो रुपये खर्चून सुद्धा दरवर्षी अगदी बोटावर मोजता येतील एवढेच विद्यार्थी आय आय टी ला गेलेले दिसतात आणि अगदीच बोटावर मोजता येतील तेवढेच विद्यार्थी एमबीबीएसला गेलेले दिसतात.
का? हुशारीची कमी होती? निश्चितच नाही!!
त्यातच यावर्षी कोरोना संकट!
परगावी विद्यार्थ्यांना पाठवणं अत्यंत धोकादायक झालं होतं. व्यवसाय बंद पडल्यामुळे अनेकांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले होते. घरातच राहिल्यामुळे अत्यंत दर्जेदार शिक्षण नेमकं कोणतं हेही विद्यार्थी, पालकांना कळेनासं झालं होतं.
डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल हा विचार करत बारामती मध्ये तेरा वर्षापासून NEET शिकवून ज्यांच्या हातून शेकडो विद्यार्थी एमबीबीएस ला गेलेत असे बुलढाण्याचे भूमिपुत्र असलेले प्रा. निखिल श्रीवास्तव, एएसपीएम मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश्वर उबरहंडे आणि संकल्प फाउंडेशन बुलढाणा च्या संचालिका सौ. विद्या अरविंद पवार यांनी एकत्र येऊन बुलढाणा जिल्ह्यामध्ये NEET च्या तयारीसाठी वाहिलेली एक स्पेशल इन्स्टिट्यूट तयार करण्यासाठी म्हणून पहिलं पाऊल उचललं. आणि आकाराला आलं पहेल एज्युकेशन!
आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना यशाचं उंच शिखर दाखवायचं म्हणून मोफत क्लासेस ला सुरुवात झाली जून पासून! व्हाट्सअप ग्रुप वर जवळपास अकरावीची साडेतीनशे मुलं जोडली गेली आणि त्यातली शंभरावर विद्यार्थी हे ऑनलाइन क्लासला दररोज उपस्थित राहू लागले पूर्णपणे मोफत! दहावीच्या वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जवळपास साडेआठशे विद्यार्थी जमा झाले आणि पाहता पाहता ऑनलाईन क्लास मध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होऊ लागले! पहेल एज्युकेशन आपली जबाबदारी ओळखून बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत सक्रिय झालेले होते! जून पासून सतत पाच महिने हे क्लासेस दररोज अखंडपणे सुरू राहिले! आपापल्या घरून हे क्लासेस करणारे विद्यार्थी आणि ते पाहणारे त्यांचे पालक यांचा प्रचंड विश्वास हा पहेल वर निर्माण व्हायला लागला! हळूहळू पहेल इन्स्टिट्यूटची जबाबदारी आता वाढत चालली होती कारण ज्या गुणवत्तेचे क्लासेस दिले जात होते त्याच गुणवत्तेचा निकाल लावून दाखवण्याची जबाबदारी आता पहेल इन्स्टिट्यूटने घेतली होती.
जानेवारीपासून ऑफलाइन क्लासेस सुरू व्हावे यासाठी आता पालक आणि विद्यार्थी यांचा जोर वाढत चालला होता! कारण स्पेशल NEET ची तयारी करून देणारी पहेल ही बुलढाणा जिल्ह्यातली एकमेव इन्स्टिट्यूट ठरली होती.
पालकांच्या संमतीने covid-19 चे सर्व नियम पाळून शेवटी जानेवारीपासून, ऑफलाइन क्लासेस सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला आणि पहेल एज्युकेशन ही एक सुरुवात ठरली बुलडाणा जिल्ह्यातील मेडिकल प्रवेशाच्या शिक्षणाची!
सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या अशा नावीन्यपूर्ण इन्स्टिट्यूटला नक्कीच भेट द्या!